S M L

संजय दत्तला तुरुंगवास होणारच !

10 मेनवी दिल्ली : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्तला तुरूंगात जावेच लागणार हे स्पष्ट झाले आहे. संजय दत्तने सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे. त्याला शरण येण्यासाठी देण्यात आलेली मुदतवाढ सात दिवसांनंतर संपत आहे. 15 मे रोजी त्याला तुरूंगात जावे लागणार आहे. या याचिकेसोबतच कोर्टाने इतर सहा दोषींची याचिकाही फेटाळून लावली आहे. संजयला पुढचे 42 महिने जेलमध्ये काढावे लागणार आहेत. आणि त्यासाठी त्याला 15 मेपर्यंत पोलिसांना शरण जावं लागणार आहे. 1993 साली झालेल्या बाम्बस्फोट प्रकरणी.. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा अशी याचिका संजय दत्तने केली होती. ती न्यायमूर्ती पी सदाशिवम आणि बीएस चौहान यांच्या खंडपीठाने फेटाळली. या वर्षीच्या 21 मार्चला सुप्रीम कोर्टाने टाडा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. पण शिक्षा एका वर्षाने कमी केली. संजयचा गुन्हा गंभीर असल्यानं त्याला माफी मिळू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. 31 जुलै 2007 रोजी संजयला टाडा कोर्टाने 9 एमएमचं पिस्तुल आणि एके-56 रायफल बाळगल्याबद्दल सहा वर्षांची शिक्षा सुनावली. ही शस्त्रात्र 1993चे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी आणल्या गेलेल्या शस्त्रसाठ्याचा एक भाग होती. हा खटला तब्बल 12 वर्ष चालला. कोर्टाने दिलेली शिक्षा मला मंजूर आहे आणि आपण दयेचा अर्ज करणार नाही, असंही त्याने स्पष्ट केलं होतं. 21 मार्च 2013 रोजी जेव्हा संजयची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय आला तेव्हा त्याच्या चार चित्रपटांचं चित्रीकरण चालू होतं. पी.के., उंगली, पोलिसगिरी आणि जंजीरचा रिमेक...या चारही चित्रपटांचं चित्रीकरण आता पूर्ण झालंय आणि संजयचा तुरूंगवास आता सहाच दिवसात सुरू होणार आहे. - हे ही वाचा - संजूबाबा रडला, कोर्टाला शरण जाण्यास तयार ! - 'संजय दत्तला माफी दिली तर मला पण द्या'शरण येण्यासाठी संजय दत्तला हवा आणखी वेळ

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 03:41 PM IST

संजय दत्तला तुरुंगवास होणारच !

10 मे

नवी दिल्ली : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्तला तुरूंगात जावेच लागणार हे स्पष्ट झाले आहे. संजय दत्तने सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे. त्याला शरण येण्यासाठी देण्यात आलेली मुदतवाढ सात दिवसांनंतर संपत आहे. 15 मे रोजी त्याला तुरूंगात जावे लागणार आहे. या याचिकेसोबतच कोर्टाने इतर सहा दोषींची याचिकाही फेटाळून लावली आहे.

संजयला पुढचे 42 महिने जेलमध्ये काढावे लागणार आहेत. आणि त्यासाठी त्याला 15 मेपर्यंत पोलिसांना शरण जावं लागणार आहे. 1993 साली झालेल्या बाम्बस्फोट प्रकरणी.. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा अशी याचिका संजय दत्तने केली होती. ती न्यायमूर्ती पी सदाशिवम आणि बीएस चौहान यांच्या खंडपीठाने फेटाळली. या वर्षीच्या 21 मार्चला सुप्रीम कोर्टाने टाडा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. पण शिक्षा एका वर्षाने कमी केली. संजयचा गुन्हा गंभीर असल्यानं त्याला माफी मिळू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं.

31 जुलै 2007 रोजी संजयला टाडा कोर्टाने 9 एमएमचं पिस्तुल आणि एके-56 रायफल बाळगल्याबद्दल सहा वर्षांची शिक्षा सुनावली. ही शस्त्रात्र 1993चे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी आणल्या गेलेल्या शस्त्रसाठ्याचा एक भाग होती. हा खटला तब्बल 12 वर्ष चालला. कोर्टाने दिलेली शिक्षा मला मंजूर आहे आणि आपण दयेचा अर्ज करणार नाही, असंही त्याने स्पष्ट केलं होतं.

21 मार्च 2013 रोजी जेव्हा संजयची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय आला तेव्हा त्याच्या चार चित्रपटांचं चित्रीकरण चालू होतं. पी.के., उंगली, पोलिसगिरी आणि जंजीरचा रिमेक...या चारही चित्रपटांचं चित्रीकरण आता पूर्ण झालंय आणि संजयचा तुरूंगवास आता सहाच दिवसात सुरू होणार आहे.

- हे ही वाचा

- संजूबाबा रडला, कोर्टाला शरण जाण्यास तयार !

- 'संजय दत्तला माफी दिली तर मला पण द्या'शरण येण्यासाठी संजय दत्तला हवा आणखी वेळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2013 09:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close