S M L
  • 'शिवाजी अंडरग्राउंड इन..' @200

    Published On: May 21, 2013 03:51 PM IST | Updated On: May 29, 2013 04:11 PM IST

    मुंबई 21 मे : नंदू माधव दिग्दर्शित शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाचा 200 वा प्रयोग नुकताच मुंबईत सादर झाला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून अभिनेता नसरूद्दीन शहा, अभिनेत्री पूजा भट्ट, आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे, लेखक शफाअत खान आणि लेखक, कवी आणि दलित चळवळीचे नेते नामदेव ढसाळ उपस्थित होते. रंगभूमी हे केवळ मनोरंजनाचं माध्यम न राहता सामाजिक बदल घडू शकतो याचाच प्रत्यय पुन्हा आला.प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात हा प्रयोग रंगला.या नंतर मान्यवरांसोबत परिसंवादही रंगला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close