S M L

सारेगामापाची महाअंतिम फेरी रंगणार

24 जानेवारी मुंबईझी टीव्हीवरील सारेगामापाची महाअंतिम फेरी शनिवारी पार पडणार आहे. अमरावतीची वैशाली भैसने-माडे या स्पर्धेत आहे. या महाअंतिम फेरीत तिला आव्हान असणार आहे ते मुंबईची पंजाबी कुडी यशिता यशपाल आणि कलकत्त्याच्या बंगाली बाबू शोमेन नंदीचं. या तिघांमध्ये वैशाली एकटीच मराठी आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष तिच्याकडे लागलंय. गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात होणा-या या अंतिम फेरीला अनेक सेलिब्रिटीजही उपस्थित असतील. यापूर्वी मराठी सारेगामापा जिंकून वैशाली महाराष्ट्राची महागायिका बनली आहे. आता पहायचं अवघ्या भारताची महागायिका ती बनतेय का नाही ते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2009 03:43 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2009 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close