S M L

सुपरफास्ट 'चेन्नई एक्स्प्रेस', 3 दिवसात 100 कोटींची कमाई

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2013 10:57 PM IST

सुपरफास्ट 'चेन्नई एक्स्प्रेस', 3 दिवसात 100 कोटींची कमाई

chenni express12 ऑगस्ट : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' चित्रपट समीक्षकांकडून फ्लॉप ठरला असला तरीही बॉक्स ऑफिसवर चेन्नई एक्स्प्रेसचाच बोलबाल आहे. 'चेन्नई एक्स्प्रेस' रिलीज आधीच बरीच हवा तयार केली होती. आणि आता तीन दिवसात ही एक्स्प्रेस सुसाट धावतेय. अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर चेन्नई एक्स्प्रेसने 100 कोटींचा पल्ला गाठलाय.

सिनेमाचं वीकेण्ड कलेक्शन झालंय तब्बल 100 कोटी 42 लाख रुपये. सिनेमाच्या पेड प्रिव्ह्युचं कलेक्शन होतं 6 कोटी 75 लाख रुपये. सिनेमाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शनही 33.12कोटी रुपये होतं. रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी'चे सर्व रेकॉर्डस् या सिनेमानं मोडीत काढले आहे.

भारतात हा सिनेमा 3500 स्क्रीन्सवर लागलाय, तर परदेशात या सिनेमाचे 700 स्क्रीन्स आहेत. विशेष म्हणजे चेन्नई एक्स्प्रेस रिलीज होण्याआधीच कमाईला सुरूवात केली होती. या सिनेमाचे सर्व हक्क यु टीव्हीने विकत घेतले आहे. त्याबरोबरच अनेक जाहिरातीतूनही सिनेमाने हातोहात कमाई केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2013 10:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close