S M L

बाॅलिवूडचा नवा 'बाबू मोशाय', ट्रेलर रिलीज

या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरवरून सिनेमा हा अॅक्शनने पुरेपूर भरलेला एक थ्रिलर सिनेमा वाटतोय.

Sonali Deshpande | Updated On: Jul 12, 2017 02:12 PM IST

बाॅलिवूडचा नवा 'बाबू मोशाय', ट्रेलर रिलीज

12 जुलै : बाबू मोशाय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो 'आनंद'मधला सोज्वळ,प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष अमिताभ बच्चन. पण आता एक अत्यंत रावडी, बोल्ड आणि आपल्या बंदुकीनं साऱ्यांना घायाळ करणारा बंदुकबाज 'बाबू मोशाय' आपल्या भेटीस येतोय. लवकरच नवाझुद्दिन सिद्धिकीचा 'बाबू  मोशाय बंदुकबाज' हा सिनेमा 25 आॅगस्टला रिलीज होतोय.

या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरवरून सिनेमा हा अॅक्शनने पुरेपूर भरलेला एक थ्रिलर सिनेमा वाटतोय. त्यासोबतच या सिनेमात रोमान्स आणि बोल्ड ड्रामाही दिसतोय. एकंदर हा 'गँग्ज आॅफ वसेपूरच्या' वळणावर जाणारा एक 'नवाझ' मसाला सिनेमा आहे. या सिनेमात नवाझसोबत बिदिता बाग आणि दिव्या दत्ता प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात घडतोय.

या सिनेमाचा ट्रेलर नवाझने फेसबुकवर शेअर केलाय आणि सोबत 'तुमने बुलाया और हम चले आये' असंही लिहिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2017 02:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close