S M L

मी गरोदर नाहीय - बिपाशा बासू

Sonali Deshpande | Updated On: Mar 28, 2017 08:22 PM IST

मी गरोदर नाहीय - बिपाशा बासू

28 मार्च : बिपाशा बासूनं ट्विट करून सांगितलंय की ती गरोदर नाही. बिपाशा बासू प्रेग्नंट असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी मीडियामध्ये फिरत होत्या. बिपाशाच्या मित्रमैत्रिणींनी तिला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली होती. म्हणून तिनं ट्विट करून खरं काय ते सांगितलंय.

दोन दिवसांपूर्वी बिपाशानं मेट्रेस ब्रँडसाठी शूट केलं होतं. तिच्यासोबत तिचा नवरा करण सिंग ग्रोवरही होता. दोघांनी मीडियाशी संवाद साधला.

गेल्या आठवड्यात बिपाशानं एका मासिकाचं कव्हर पेज लाँच केलं. त्यात ती एकदम फिट दिसत होती.

बिपाशा म्हणते, 'सध्या तिला करियरवर फोकस करायचंय.आता तरी कुटुंब वाढवण्याचा प्रश्न नाही.'

लग्नानंतर बिपाशाला सिनेमा मिळाला नाहीय. तिच्या नवऱ्याचीही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे गरोदर असल्याच्या अफवेमुळे कामावर परिणाम होऊ नये याची काळजी तिनं घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2017 08:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close