S M L

बाहुबली प्रभासनं लिहिली भावनिक पोस्ट

'मला देशातल्या अनेक भागांमधून आणि देशाबाहेरूनही भरपूर प्रेम मिळतंय. मी खरोखर भारावून गेलोय.'

Sonali Deshpande | Updated On: May 9, 2017 12:45 PM IST

बाहुबली प्रभासनं लिहिली भावनिक पोस्ट

09 मे : 'बाहुबली 2'  या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केलीय. त्यामुळे भावुक झालेल्या प्रभासनं आपल्या फॅन आणि सिनेमाचे दिग्दर्शक राजामौली यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केलीय.

तो लिहितो, ' आपण व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल मी तुम्हा सर्वांना अलिंगन देतो. बाहुबलीचा प्रवास खूप मोठा आहे. पण यात मी जे काही मिळवलं ते तुम्हा सर्वांचं प्रेम अाहे. त्यासाठी मला खूप मेहनतही घ्यावी लागली. मला देशातल्या अनेक भागांमधून आणि देशाबाहेरूनही भरपूर प्रेम मिळतंय. मी खरोखर भारावून गेलोय.'

एवढी मोठी भूमिका दिल्याबद्दल त्यानं दिग्दर्शकाचेही आभार मानलेत. ' माझ्यावर तुम्ही विश्वास टाकलात आणि बाहुबलीसारखी  व्यक्तिरेखा देऊन माझा पुढचा प्रवास एकदम स्पेशल केलात, त्याबद्दल धन्यवाद. '

37 वर्षांचा प्रभास सध्या अमेरिकेत सुट्टी एंजाॅय करतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2017 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close