S M L

प्रियांका चोप्रा जगातली श्रीमंत टीव्ही अभिनेत्री, फोर्ब्सनं केलं प्रसिद्ध

फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार प्रियांकाची वर्षभराची कमाई 64 कोटी 60 लाख रुपये आहे. तिनं जास्तीत जास्त पैसे जाहिरातींमधून कमावलेत.

Sonali Deshpande | Updated On: Sep 27, 2017 04:44 PM IST

प्रियांका चोप्रा जगातली श्रीमंत टीव्ही अभिनेत्री, फोर्ब्सनं केलं प्रसिद्ध

27 सप्टेंबर : फोर्ब्स मासिकानं टीव्हीवरच्या श्रीमंत अभिनेत्रींची यादी प्रसिद्ध केलीय. त्यात आपल्या प्रियांका चोप्राचं नाव आहे. प्रियांका या यादीत दुसऱ्यांदा आलीय. तिचा नंबर आठवा आहे.

फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार प्रियांकाची वर्षभराची कमाई 64 कोटी 60 लाख रुपये आहे. तिनं जास्तीत जास्त पैसे जाहिरातींमधून कमावलेत.

या श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत नंबर वनवर आहे सोफिया वेरगारा. ती गेली सहा वर्ष टाॅपमध्ये आहे. गेल्या वर्षभरातली तिची कमाई 272 कोटी रुपये आहे.

फोर्ब्सनं प्रियांकाला बाॅलिवूडच्या श्रीमंत अभिनेत्रींमध्ये ठेवलं होतं. त्यात दीपिकाही होती. आताही प्रियांकासाठी हे मोठं यश म्हणता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close