S M L

कोई नही जानता मैं क्या फिल कर रही हूॅं'- 'मॉम' श्रीदेवी

श्रीदेवीच्या मॉम या सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झालाय.हा ट्रेलर प्रेक्षकांची सिनेमा बद्दलची उत्कंठा खूप वाढवतोय.

Sonali Deshpande | Updated On: Jun 25, 2017 03:01 PM IST

कोई नही जानता मैं क्या फिल कर रही हूॅं'- 'मॉम' श्रीदेवी

 

25 जून :  नक्की श्रीदेवी काय फील करतेय ? हे जाणण्यासाठी मॉम पहायला थेटरमध्येच जाव लागेल. पण सध्या श्रीदेवीच्या मॉम या सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झालाय.हा ट्रेलर प्रेक्षकांची सिनेमा बद्दलची उत्कंठा खूप वाढवतोय. याच ट्रेलरमध्ये श्रीदेवी हे उत्सुकता निर्माण करणारं वाक्य म्हणते.

या सिनेमाचा पहिला ट्रेलर 3 जूनला रिलीज झाला होता . हा सिनेमा 7 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात श्रीदेवी एका अत्यंत इन्टेन्स भूमिकेत दिसतेय.या सिनेमात श्रीदेवीसोबत अक्षय खन्ना ,अभिमन्यू सिंग साजल अली हे प्रमुख भूमिकेत आहेत .या सिनेमाचा निर्माता बोनी कपुर आहे तर रवी उद्यावर दिग्दर्शक आहे. या सिनेमाला संगीत आॅस्कर विजेत्या ए आर रेहमानने दिलंय.

मॉम हा एक थ्रिलर सिनेमा असून तो श्रीदेवीसाठी अत्यंत स्पेशल आहे . कारण हा श्रीदेवीचा 300वा चित्रपट असेल आणि यावर्षी तिला बॉलिवूडमध्ये 50 वर्ष पूर्ण होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2017 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close