S M L

सनी लिआॅन विमान अपघातातून थोडक्यात बचावली

सनी लिआॅन आणि तिचे सहकारी ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान खराब हवामानामुळे क्रॅश होता होता वाचलं असं टि्वट तिने केलंय.

Sachin Salve | Updated On: May 31, 2017 10:21 PM IST

सनी लिआॅन विमान अपघातातून थोडक्यात बचावली

31 मे : लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सनी लिआॅन विमान अपघातातून थोडक्यात बचावलीये. सनी लिआॅन आणि तिचे सहकारी ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान खराब हवामानामुळे क्रॅश होता होता वाचलं असं टि्वट तिने केलंय.

लातूरमध्ये एका जिमच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपून सनी लिआॅन मुंबईकडे एका खासगी विमानाने रवाना झाली होती. मात्र, खराब हवामानामुळे अचानक विमान क्रॅश होणार होतं पण वैमानिकाने आपले संतुलन न ढासळता विमानावर नियंत्रण मिळवले असं  सनी लिआॅनने टि्वटरवर व्हिडिओ टाकून सांगितलं. ती म्हणते, आम्ही देवाचे आभारी आहोत, आमचं विमान क्रॅश होणार होतं. पण सुदैवाने या अपघातातून आम्ही वाचलो. खराब हवामानामुळे हे विमान क्रॅश होणार होतं असंही तिने म्हटलं. तसंच आपल्यासोबत तिचा पती डॅनियल वेबर आणि इतर सहकाऱ्यांनीही विमान अपघातातून वाचल्याबद्दल देवाचे आभार मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2017 06:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close