S M L

'वळू'फेम डुरक्या बैलाचा मृत्यू

'वळू'चं म्हणजे डुरक्या बैलाचं निधन झालंय.

Sonali Deshpande | Updated On: Jun 28, 2017 03:33 PM IST

'वळू'फेम डुरक्या बैलाचा मृत्यू

28 जून : 2008 साली आलेला वळू चित्रपट कुणाला नाही माहीत? या चित्रपटातल्या उद्दाम वळूनं तर साऱ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. याच सुपरहिट मराठी चित्रपटातल्या 'वळू'चं म्हणजे डुरक्या बैलाचं निधन झालंय. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते.

चित्रपटातला डुरक्या बैल म्हणजे वास्तवातला 'राजा' बैल.हा सांगलीच्या पांजरपोळ संस्थेतला बैल होता.राजा बैल नावाप्रमाणे खरोखरच 'राजा' होता. साऱ्या पांजरपोळ संस्थेचे त्याच्यावर प्रेम होतं. त्याचं वजन तब्बल 300 किलो होतं तर वय 17-18 वर्ष होतं. त्याचं निधन आजारपण आणि म्हातारपणामुळे झालंय.

त्याच्या मरणानंतर पांजरपोळ संस्थेनं त्याचं स्मारक उभारण्याचा निर्णय घेतलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 03:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close