S M L

होळी होईपर्यंत बापूंच्या कार्यक्रमांवर बंदी

19 मार्चमुंबई : होळीचा सण होईपर्यंत आसाराम बापूंच्या राज्यातल्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पाणी उधळणार नाही याची लेखी हमी आसाराम बापूंनी दिली तर या कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल अन्यथा आसाराम बापूंच्या राज्यातल्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यात दुष्काळ परिस्थिती असताना आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांनी नागपूरमधल्या होळीवरून चौफेर टीका होऊनही मंगळवारी बापूंनी नवी मुंबईत होळी साजरी केली. त्यात पुन्हा त्यानी पाण्याचा वापर केला. नागपूरइतकी पाण्याची उधळपट्टी केली नसली तरी एवढा वाद होऊनही पाण्याचा वापर करणं टाळलं नाही. उलट त्यांनी मीडियावरच टीका केली. एका माणसासाठी 60 मिली पाणी लागते. पाण्याने होळी खेळल्यानं पाण्याचा सदुपयोग होतोय, यामुळे लोकांचे आजार दूर होता, मानसिक आजार दूर होतात यासाठी अर्धा ग्लास काय एक टँकर सुद्धा पाणी लागले तरी नुकसान काहीही नाही असा दावा त्यांनी केला. तसंच पाण्याचा अपव्यय होतो हे काही सामाजिक संस्थांचे कूट कारस्थान आहे त्यांनी मीडियाला भडकवले आहे असा आरोपही बापूंनी केला. तसंच सत्संगचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर त्यांच्या भक्तांनी हल्ला केला. भक्तांनी एकच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला चढवला. संतप्त भक्तांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत मैदानातून पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. हे भक्त एवढ्यावर थांबले नाही त्यांनी पत्रकारांचा पाठलाग करून मारहाण केली आणि दगडफेक केली. या हल्ल्यात आयबीएन लोकमतचे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीम मोरे जखमी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2013 06:24 AM IST

होळी होईपर्यंत बापूंच्या कार्यक्रमांवर बंदी

19 मार्च

मुंबई : होळीचा सण होईपर्यंत आसाराम बापूंच्या राज्यातल्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पाणी उधळणार नाही याची लेखी हमी आसाराम बापूंनी दिली तर या कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल अन्यथा आसाराम बापूंच्या राज्यातल्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यात दुष्काळ परिस्थिती असताना आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांनी नागपूरमधल्या होळीवरून चौफेर टीका होऊनही मंगळवारी बापूंनी नवी मुंबईत होळी साजरी केली. त्यात पुन्हा त्यानी पाण्याचा वापर केला. नागपूरइतकी पाण्याची उधळपट्टी केली नसली तरी एवढा वाद होऊनही पाण्याचा वापर करणं टाळलं नाही. उलट त्यांनी मीडियावरच टीका केली. एका माणसासाठी 60 मिली पाणी लागते. पाण्याने होळी खेळल्यानं पाण्याचा सदुपयोग होतोय, यामुळे लोकांचे आजार दूर होता, मानसिक आजार दूर होतात यासाठी अर्धा ग्लास काय एक टँकर सुद्धा पाणी लागले तरी नुकसान काहीही नाही असा दावा त्यांनी केला. तसंच पाण्याचा अपव्यय होतो हे काही सामाजिक संस्थांचे कूट कारस्थान आहे त्यांनी मीडियाला भडकवले आहे असा आरोपही बापूंनी केला. तसंच सत्संगचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर त्यांच्या भक्तांनी हल्ला केला. भक्तांनी एकच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला चढवला. संतप्त भक्तांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत मैदानातून पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. हे भक्त एवढ्यावर थांबले नाही त्यांनी पत्रकारांचा पाठलाग करून मारहाण केली आणि दगडफेक केली. या हल्ल्यात आयबीएन लोकमतचे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीम मोरे जखमी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2013 03:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close