S M L

नितीन गडकरींविरोधात शिवसेनेची मोर्चेबांधणी?

Samruddha Bhambure | Updated On: Mar 20, 2014 04:10 PM IST

नितीन गडकरींविरोधात शिवसेनेची मोर्चेबांधणी?

shekhar savarbandhe19 मार्च : भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना नागपुरातच अडचणीत आणण्याची तयारी शिवसेनेने चालविली आहे. त्यासाठी जिल्हाप्रमुख आणि माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांनी अपक्ष किंवा बसपाचे उमेदवार म्हणून मैदानात उतरावे यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. हा दबाव थेट मातोश्रीवरून आणला जात असल्याची खळबळजनक माहिती सुत्रांसुत्रांनी दिली आहे.

लोकसभेच्या २00९च्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे उमेदवार माणिकराव वैद्य यांना जवळपास सव्वा लाख मते मिळाली होती. वैद्य यांच्या पाठीशी भाजपाने आर्थिक बळ उभे केल्याची चर्चा होती. हेतू स्पष्ट होता की वैद्य यांनी जास्त मते घेतल्याचा फटका काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांना बसेल. त्यामुळे, प्रत्यक्ष निकालात असे लक्षात आले की वैद्य यांनी दलित समाजापेक्षा त्यांच्या तेली समाजाची मते जास्त घेतली.

नागपुरात तेली समाज हा भाजपाचा परंपरागत मतदार मानला जातो. म्हणूणचं तेली समाजाचा उमेदवार गडकरींसाठी डोकेदुखी ठरू शकतो म्हणून या समाजाचे असलेले सावरबांधे यांच्यावर लढण्यासाठी प्रचंड दबाव आणला जात आहे.

मात्र या बातमीत काहीचं तथ्य नसल्याचं सावरबांधे यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2014 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close