S M L

मनसेचा शेकापला पाठिंबा

Samruddha Bhambure | Updated On: Mar 20, 2014 04:10 PM IST

Image raj_thakarey_300x255.jpg19 मार्च :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा जाहीर करुन शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. मावळ आणि रायगड या मतदारसंघात मनसेचा उमेदवार देण्याऐवजी शेकापच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे. यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे.

शेकापचे नेते जयंत पाटील यांनी आज कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या बैठकीत मावळ आणि रायगडच्या जागेसंदर्भात चर्चा झाली. रायगड आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांमध्ये शेकाप आपले उमेदवार उभे करतय आणि त्या उमेदवारांना मनसे पाठींबा देणार असल्याचं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2014 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close