S M L

अमिता चव्हाण यांचा नांदेड मधून उमेदवारी अर्ज दाखल

Samruddha Bhambure | Updated On: Mar 25, 2014 02:42 PM IST

अमिता चव्हाण यांचा नांदेड मधून उमेदवारी अर्ज दाखल

25 मार्च :   अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी नांदेडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबतच पालकमंत्री डी. पी. सावंत यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नांदेडमधला काँग्रेसचा उमेदवार अजून जाहीर झाला नाही.

लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या दुपारपर्यंतची वेळ आहे, मात्र नांदेडचा काँग्रेसचा उमेदवार अजून जाहीर झाला नाही. पण त्यापूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण आणि पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

हे दोघेही काँग्रेस पक्षातील आहेत, मात्र उमेदवारी कोणाला मिळणार याचा तिढा अजूनही कायम आहे.

या दोघांपैकी कुणाला काँग्रेस पक्षाचा बी फॉर्म मिळेल याची उत्सुकता आहे किंवा ऐनवेळी अशोक चव्हाण उमेदवारी दाखल करू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2014 02:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close