S M L

अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी जाहीर

Sachin Salve | Updated On: Mar 25, 2014 09:47 PM IST

Image img_145602_ashokchavahan3245.jpg_240x180.jpg25 मार्च : आदर्श सोसायटी घोटाळ्यातील आरोपी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजकीय वनवास आता संपणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अशोक चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलीय. आज शेवटच्या क्षणी काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली.

तसंच अशोक चव्हाण यांचं प्रकरण सुरेश कलमाडी यांच्यापेक्षा वेगळं आहे, असा युुक्तिवादही माकन यांनी केलाय. कोणत्याही कोर्टाने किंवा निवडणूक आयोगाने अशोक चव्हाण यांना निवडणूक लढवण्यापासून रोखलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्या बुधवारी सकाळी 11 वाजता अशोक चव्हाण आपला अर्ज दाखल करणार आहे. अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे नांदेडमध्ये त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केलाय.

निवडणूक लढवण्यास पात्र -अशोक चव्हाण

आपण तिकीट मिळवण्यासाठी हायकमांडवर आपण दबाव आणला नाही. नांदेडमधून लोकसभा निवडणूक जिंकून दाखवणार आणि गेल्या अनेक वर्षांपासून याचा आपल्याला अनुभव आहे. असा विश्वास अशोक चव्हाण यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना व्यक्त केला. तसंच माझ्यावर आरोप जरी असले तरी कायद्याने मी निवडणूक लढवण्यास पात्र आहे. माझ्यावर आरोप अजून सिद्ध झाले नाही. त्यामुळे मला उमेदवारी देण्यासापासून हायकमांडाला कोणीही रोखू शकत नव्हते. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मी निर्दोष आहे असंही चव्हाण म्हणाले.

उमेदवारीसाठी अशोकरावांची 'आदर्श' खेळी

विशेष म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच अशोक चव्हाणांंनी उमेदवारीसाठी काँग्रेस हायकमांडकडे आग्रह धरला होता. पण हायकमांडनी मात्र अशोक चव्हाण यांना विरोध दर्शवला होता. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. पण काँग्रेसने त्यालाही विरोध दर्शवला.  हायकमांडच्या विरोधानंतरही अशोक चव्हाणांनी जोरदार लॉबिंग करत पक्षनेतृत्वावर दबाव कायम ठेवला.

हेच नाहीतर औरंगाबादमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेत अशोक चव्हाण यांना स्टेजवर जागा देण्यात आली होती. त्याचवेळी अशोक चव्हाण यांना उमेदवारी मिळणार अशी दाट शक्यता होती. आता ती खरी ठरलीय. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी नांदेडचे सध्याचे खासदार भास्करराव पाटील-खतगावकर यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे.

तसंच आज अगदी अचानक पत्नी अमिता आणि विश्वासू सहकारी डी. पी. सावंत यांना डमी उमेदवारी अर्ज भरायला लावले. आणि पक्षनेतृत्वावर दबाव वाढवला. त्यामुळे पक्षश्रेष्ठींचा नाईलाज झाला आणि शेवटच्या क्षणी पक्षाला अशोक चव्हाणांच्या नावाची घोषणा करावी लागली. आता आदर्श घोटाळ्यामुळे गेल्या काही वर्षांपासून राजकीय वनवासात असलेले अशोक चव्हाण पुन्हा राजकारणात सक्रीय होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2014 09:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close