S M L

राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटलांची अण्णा हजारेंवर केली टीका

Samruddha Bhambure | Updated On: Mar 26, 2014 03:00 PM IST

राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटलांची अण्णा हजारेंवर केली टीका

padmasinha and anna hazare26 मार्च :  अण्णा हजारे आणि पद्मसिंह पाटील यांचा सामना पुन्हा महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील यांना उस्मानाबादमधून उमेदवारी देण्यात आली आहे. खुनाचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप असून सुद्धा राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी का दिली असा सवाल करत आपण डॉ. पाटील यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं अण्णांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं. त्याबद्दल अण्णा हजारे यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना डॉ. पाटील यांनी अण्णांवर टीका केली.

'अण्णांचे आरोप बिनबुडाचे आहेत, त्यांना माझ्याविरोधात प्रचार करायचा असेल तर करू देत' असं उत्तर देत पद्मसिंह पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वर खालच्या शब्दांमध्ये टीका केलीे आहे.

 दरम्यान जोरदार शक्ती प्रदर्शन करत पाटलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ऐन निवडणूकीच्या तोंडावर डॉ.पाटील आणि अण्णा हजारे यांच्यातला वाद उफाळून आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 26, 2014 08:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close