S M L

माढ्यात मोहिते-पाटील विरुद्ध मोहिते पाटील रिंगणात

Sachin Salve | Updated On: Mar 27, 2014 03:54 PM IST

pratapsingh mohite27 मार्च : सोलापूर जिल्ह्यात माढा लोकसभा मतदरसंघातल्या उमेदवारीवरुन मोहिते-पाटील घराण्यातली भाऊबंदकी टोकाला पोहोचली आहे. राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलाय तर बुधवारी म्हणजेच शेवटच्या दिवशी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

माढ्यात जिथं शरद पवारांनी फारसे काही केले नाही तिथं विजयसिंह काय करणार, असा सवाल करत प्रतापसिंह यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलंय. माढ्यातील भावा-भावातली ही लढाई निवडणुकीत उत्सुक्तेची ठरणार आहे. अडीचशे वाहनांचा ताफा घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रतापसिंहांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

प्रतापसिंहांची उमेदवारी औटघटकेची नाही. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच नाही असं प्रतापसिंहांचा मुलगा धवलसिंह मोहिते पाटील यांनी स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे माढ्याची जागा राष्ट्रवादीने विजय सिंह मोहिते पाटलांना दिल्यामुळे प्रतापसिंह मोहिते पाटील तीव्र नाराज झाले होते. आम्हा भावांमध्ये शरद पवारांनी भांडणं लावला असा घणाघाती आरोप करत त्यांनी निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं होतं. प्रतापसिंह यांनी रिपाइंकडून जागा लढवणार असल्याची चर्चा होती पण महायुतीने सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिल्यामुळे रिपाइंची अडचण झाली त्यामुळे प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2014 03:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close