S M L

मोदींना पाठिंबा द्यायचा असेल तर भाजपमध्ये या -राजनाथ सिंह

Sachin Salve | Updated On: Apr 9, 2014 04:02 PM IST

मोदींना पाठिंबा द्यायचा असेल तर भाजपमध्ये या -राजनाथ सिंह

rajnath_singh_raj_thackrey08 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना पाठिंबा देत लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या मनसेच्या 'इंजिन'मधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी चांगलीच हवा काढून घेतली आहे.

कोणीतरी इथं नरेंद्र मोदींना पाठिंबा देतंय असं ऐकण्यात आलंय. जर पाठिंबा देत असाल तर महायुतीत यावं लागेल नाही तर भाजपमध्ये विलीन व्हावं असा सल्ला राजनाथ सिंह यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता दिलाय. पुण्यात राजनाथ सिंह यांच्या उपस्थिती पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

"मनसे लोकसभा लढवणार आणि निवडून आलेले उमेदवार भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील" अशी गर्जना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापनदिनी केली. राज यांच्या खेळीमुळे भाजप नेते तर सुखावले पण शिवसेनेनं संताप व्यक्त केला.

विशेष म्हणजे भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी राज यांची 'टाळी'साठी भेट घेतल्यामुळे महायुतीत चांगलाच गोंधळ उडाला होता. सहावा भिडू येतो की काय ? यामुळे शिवसेनेनं तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपला धारेवर धरलं होतं. या नाट्यानंतर राज ठाकरे यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरत मोदींना पाठिंब्याची घोषणा करून आणखी भर टाकली. पण आता भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मनसेच्या इंजिनमधून हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केलाय.

पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी बसपा व्हाया आम आदमी पार्टी असा प्रवास करत आज (मंगळवारी) भाजपमध्ये प्रवेश केलाय. यावेळी राजनाथ सिंह यांनी राज यांच्या 'नमो नमो'चा समाचार घेतला. शिवसेना हा कालही एनडीएमध्ये होता, आजही आहे आणि उद्याही राहिलं. शिवसेना आणि भाजपचे संबंध जुने आणि चांगले आहे. पण अलीकडेच काही लोकं नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देऊन मतांचा जोगवा मागत आहे. पण आम्ही तुम्हीला विचारलं नाही, पाठिंबा मागितलाच नाही तर पाठिंबा देताच कशाला ? असा सवाल राजनाथ यांनी राज यांचे नाव न घेता विचारला.

तसंच जर नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचाच असेल तर महायुतीत यावं जर हेही जमत नसेल तर आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करा असा सल्लाच राजनाथ यांनी राज ठाकरेंना दिलाय. मोदींच्या नावांनी जर प्रचार करत असतील आणि आश्वासनं देत असतील तर त्याला काहीच अर्थ नाही असा टोलाही राजनाथ यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2014 11:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close