S M L

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज बडोद्यातून भरणार अर्ज

Samruddha Bhambure | Updated On: Apr 9, 2014 12:46 PM IST

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज बडोद्यातून भरणार अर्ज

8879_Narendra_Modi09 एप्रिल :  भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज बडोदा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंत ते आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी मोदी बडोद्यात एक रोड शो घेणार आहेत. मोदींच्या उमेदवारी अर्जाला अनुमोदक म्हणून बडोद्यातले एक चहावाला आणि शहरातल्या एका राजघराण्यातला एक सदस्य त्यांच्यासोबत असतील. बडोद्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेसतर्फे मधुसुदन मिस्त्री आणि आम आदमी पार्टीतर्फे सुनिल कुलकर्णी यांनी मोदींना आव्हान दिलं आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी आज उमेदवारी अर्ज भरत असल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे त्याचं बरोबर शहरामध्ये ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या निमित्ताने भाजप आणि मोदी समर्थक मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन घडवून आणतील अशी अपेक्षा आहे. मोदींबरोबर मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्तेही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाऊ शकतात. इतकंच नाही तर नरेंद्र मोदी बडोद्यातून 6 लाखांहून जास्त मताधिक्य मिळवतील अशी आशाही त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 9, 2014 10:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close