S M L

हुकूमशाह मोदी सत्तेवर आल्यास लोकशाही धोक्यात येईल-मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Apr 12, 2014 05:36 PM IST

cm pruthviraj chavan12 एप्रिल : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवलाय. मोदी हुकूमशाही प्रवृत्तीचे आहे. ते सत्तेत आले तर पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत अशी जळजळीत टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

तसंच मोदींनी भाजप हायजॅक केलीय. सरकार आणि लोकशाहीसुद्धा हायजॅक करतील. मोदींना इतिहास, अर्थव्यवस्थेचं ज्ञान नाही. देशाची जबाबदारी देणं हे धोक्याचं अशी गंभीर टीकाही त्यांनी केलीय.

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसंच नरेंद्र मोदींना पंतप्रधान तर गोपीनाथ मुंडेंना मुख्यमंत्री व्हायची घाई झालीय असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2014 01:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close