S M L

नाशिक, नगरमध्येही आघाडीत कुरबुरी सुरूच

Sachin Salve | Updated On: Apr 14, 2014 04:58 PM IST

Image img_164372_bhujbal46_240x180.jpg14 एप्रिल : सिंधुदुर्गापाठोपाठ नाशिक आणि अहमदनगरमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादीतली कुरबूर अजूनही सुरूच आहे. नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांचा प्रचार करायचा की तटस्थ राहायचं याचा निर्णय सिन्नरचे काँग्रेस आमदार माणिक कोकाटे उद्या (मंगळवारी) जाहीर करणार आहे.

राष्ट्रवादीने विश्वासात घेतलं नसल्याची सिन्नरमध्ये काँग्रेसची नाराजी आहे. दुसरीकडे नगरमध्ये काँग्रेस मदत करत नाही तर शिर्डीत आम्ही का मदत करावी असा सवाल राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित केलाय.

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचे राजीव राजाळे यांच्या विरोधात बी.जी. कोळसे पाटील अपक्ष म्हणून उभे आहेत. काँग्रेसचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राजाळेंऐवजी कोळसेंना मदत करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिर्डीत आम्ही काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांना मदत का करावी असा प्रश्न राष्ट्रवादीचे मंत्री मधुकर पिचड यांनी उपस्थित केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2014 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close