S M L

राहुल गांधी लातुरात आले पण गिरी प्रकरणावर बोललेच नाही !

Sachin Salve | Updated On: Apr 14, 2014 05:40 PM IST

राहुल गांधी लातुरात आले पण गिरी प्रकरणावर बोललेच नाही !

54rahul_gandhi_latur14 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची लातूरमध्ये भव्य सभा पार पडलीय. या सभेत राहुल गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. पण लातूरमध्ये आपल्याच पक्षाची कार्यकर्ती कल्पना गिरी हत्येप्रकरणावर राहुल गांधींनी चकार शब्दही काढला नाही. या प्रकरणावर राहुल गांधी मौन बाळगून राहिले आणि आपलं भाषण आटोपत घेतलंय.

लातूरमध्ये आघाडीचे उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांच्या प्रचार सभेसाठी राहुल गांधी यांनी हजेरी लावली. यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. मोदी कितीही विकासाचा दावा करत असले तरी गुजरातचं मॉडेल नव्हे हे तर हे टॉफी मॉडेल आहे अशी खिल्ली राहुल यांनी उडवली. सध्या मोदी आणि अदानींची भागिदारी सुरू असून गुजरात हे उद्योगपती राज्य चालवतं आहे अशी टीकाही त्यांनी केली.

विरोधकांच्या भाषणात एकही चांगला मुद्दा नाही कोणाविषयी चांगले उल्लेख नाहीत. त्यांच्या इंडिया शायनिंगचा प्रचार खोटा होता यावेळीही त्यांचा हा फसवा फुगा लवकरच फुटणार आणि गरीबांचं सरकार सत्तेवर येणार असंही राहुल म्हणाले. गुजरातमध्ये एका तरुणीच्या मागावर सरकारी यंत्रणा कामासाठी लावण्यात आली. एवढेच नाही तर त्या तरुणीचा फोन टॅपही करण्यात आला आणि आता महिला सक्षमीकरणाच्या मोठ्या मोठ्या गप्पा ही नेते करत आहे. त्यांच्या आणि आमच्याच हाच फरक आहे आम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी नेहमी पुढाकार घेता असंही राहुल म्हणाले.

पण राहुल गांधी आजच्या सभेमध्ये कल्पना गिरी खून प्रकरणावरून काय भूमिका घेतात त्याकडे स्थानिकांचं लक्ष लागून होतं. पण राहुल यांनी यावर मौन बाळगलं. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात बुधवारी लातूरमधल्या सभेत कल्पना गिरी हत्याकांडावरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. "काँग्रेसवाले पक्षातील महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाही तर देशातील महिलांना काय सुरक्षा पुरवणार " अशी टीका मोदींनी केली होती. त्यामुळे लातूरच्या सभेत राहुल गांधी काय बोलता याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं होतं पण राहुल गांधी यांनी गिरी प्रकरणावर मौन बाळगलं.

कल्पनाच्या कुटुंबीयांचा मतदानावर बहिष्कार

दरम्यान, आपल्या मुलीचा बळी काँग्रेसनं घेतला त्यामुळे आपण मतदानावर बहिष्कार घालत आहेत असं कल्पना गिरीच्या आईवडिलांनी जाहीर केलंय. राहुल गांधींना आपल्या पदाधिकर्‍यांच्या जाीवाचं मोल कळत असेल तर त्यांनी आमच्या घरी भेट द्यावी, असं आवाहन कल्पना गिरीच्या आईवडिलांनी केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2014 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close