S M L

मनसे काय युपीचा पक्ष वाटला का? -राज ठाकरे

Sachin Salve | Updated On: Apr 15, 2014 12:54 PM IST

rajthakare_dombivali_14 एप्रिल :  महायुतीला पाठिंबा द्या किंवा भाजपमध्ये विलीन होण्यास मनसे हा काय उत्तर प्रदेशमधला पक्ष वाटला का? असा सवाल करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांना टोला लगावलाय. आमचा पाठिंबा हा नरेंद्र मोदी यांना कायम असेल. पण आमच्या पाठिंब्याबद्दल नरेंद्र मोदी काही बोलत नाहीत तर तुम्ही का बोलताय असा सवालही राज यांनी राजनाथ सिंह यांना विचारलाय. राज ठाकरे यांची पुण्यातील कोथरूडमध्ये सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना पाठिंबा देत लोकसभेच्या रिंगणात मनसे उतरली. पण मनसेच्या या खेळीचा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मागील आठवड्यात पुण्यात झालेल्या सभेत चांगलाच समाचार घेतला.

कोणीतरी इथं नरेंद्र मोदींना पाठिंबा देतंय असं ऐकण्यात आलंय. जर पाठिंबा देत असाल तर महायुतीत यावं लागेल नाही तर भाजपमध्ये विलीन व्हा असा सल्ला राजनाथ सिंह यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता दिला. तसंच आम्ही तुम्हीला विचारलं नाही, पाठिंबा मागितलाच नाही तर पाठिंबा देताच कशाला ? असा सवालही राजनाथ यांनी विचारला होता. मोदींच्या नावांनी जर प्रचार करत असतील आणि आश्वासनं देत असतील तर त्याला काहीच अर्थ नाही असा टोलाही राजनाथ यांनी लगावला होता.

राजनाथ यांच्या टीकेला राज ठाकरे यांनी पुण्यातच झालेल्या सभेत प्रत्युत्तर दिलं. महायुतीला पाठिंबा द्या किंवा भाजपमध्ये विलीन होण्यास मनसे हा काय उत्तर प्रदेशमधला पक्ष वाटला का? असा टोला राज यांनी लगावला. आम्ही नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. राजनाथ सिंह यांना दिला नाही. नरेंद्र मोदी याबद्दल काही बोलत नाही तर तुम्ही का बोलता ? असा सवालच राज यांनी उपस्थित केला. मोदी यांना आताच पाठिंबा दिला नाही. मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर होण्याअगोदरच मोदींच्या सोबत असल्याचं आम्ही जाहीर केलं होतं त्यामुळे आताच पाठिंबा दिला हा प्रश्नच उद्भवत नाही. मोदींसारखा नेता पंतप्रधान व्हावा असंही राज म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2014 09:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close