S M L

कोकणात 'राडा' सुरूच, राणे आणखी अडचणीत

Sachin Salve | Updated On: Apr 15, 2014 07:05 PM IST

कोकणात 'राडा' सुरूच, राणे आणखी अडचणीत

rane_Vs_kesarkar15 एप्रिल : आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे पण सिंधुदुर्गात राणे विरुद्ध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा अजूनही सुरूच आहे. आज (मंगळवारी) कुडाळमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होताय पण या मेळाव्याकडेही राष्ट्रवादीचे बंडखोर नेते दीपक केसरकर आणि त्यांच्या समर्थक, पदाधिकार्‍यांनी पाठ फिरवली आहे.

राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीसोबत आहे असा दावा संपर्कमंत्री उदय सामंत यांनी केला होता. यासाठी सावंत यांनी आज मेळाव्याचं आयोजन केलं होतं. पण जे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या सभेला गैरहजर राहिले त्यामुळे सावंतांनी आयोजित केलेल्या मेळाव्याकडे तर त्यांनी साफ पाठ फिरवली.

विशेष म्हणजे केसरकर यांनी सोमवारी घेतलेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते. यावेळी राणेंना मत देऊ नका, नरकासुराचा वध करा असं सांगत मतं शिवसेनेकडे वळवण्याची एकमुखी घोषणाही करण्यात आली. केसरकर यांच्या निर्णयामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून दीपक केसरकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. दरम्यान, दुसरीकडे केसरकरांना उत्तर देण्यासाठी म्हणून स्वत: नारायण राणे यांनी रत्नागिरीतल्या सभा रद्द करुन सावंतवाडीत सभा आयोजित केली आहे. आता नारायण राणे काय बोलता याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.

 राणे राष्ट्रवादी वादाची ठळक कारणं

-7 एप्रिल 2011 ला राष्ट्रवादीचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधल्या कार्यालयाची निलेश राणेंच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड

-12 जुलै 2011 ला सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर वेंगूर्लेतल्या आमसभेत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून चप्पल फ़ेकण्यात आली.

- 22 जानेवारी 2012 ला अजित पवार यांची कुडाळ मधल्या जाहीर सभेत राणेंवर दहशतवादाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका.

- 31 जानेवारी 2012 ला कुडाळ मध्ये नारायण राणेंनी घेतली वस्त्रहरण नावाची सभा. अजित पवार, सुप्रिया सुळे, भास्कर जाधव, दीपक केसरकर या राष्ट्रवादीच्या नेत्यांना केलं टीकेचं लक्ष्य.

- 14 ऑक्टोबर 2012 ला निलेश राणेंनी आपल्या वृत्तपत्रातून भास्कर जाधव यांना वरीष्ठ नेत्यांचे बूट पुसणारा कुत्रा असं हीणवलं

याशिवाय सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत आणी त्यानंतर वेंगूर्ले नगरपरिषदेत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांना फ़ोडून राणेंनी काँग्रेसमध्ये आणलं. आमदार दीपक केसरकर यांना मतदारसंघात एकही आमसभा घेऊ दिली नाही. या आणि अशा अनेक गोष्टीचा राग स्थानिक राष्ट्रवादीच्या मनात आहे. आणि यामुळेच सध्या तरी राणे राष्ट्रवादी मनोमिलन होणं कठीण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2014 04:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close