S M L

नागपुरात 1 लाख नावं यादीतून गायब,पुन्हा मतदानाची मागणी

Sachin Salve | Updated On: Apr 15, 2014 04:52 PM IST

नागपुरात 1 लाख नावं यादीतून गायब,पुन्हा मतदानाची मागणी

46nagpur_voting_issiue15 एप्रिल : नागपूर लोकसभा मतदार संघात एक लाख मतदारांचे नाव मतदार यादीत नसल्याचा आरोप काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीने केलाय. त्यामुळे या लोकांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी काँग्रसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांनी केली आहे.

दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी काँग्रेसने मतदारांच्या हाती दिलेल्या मतचिठ्ठीत चुकीचे मतदान केंद्रे दाखवून मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप केलाय.

या संदर्भात आम आदमी पार्टीने एवढ्या मोठ्या संख्येत मतदार निवडणुकीपासून वंचित राहिल्याने पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. या संदर्भात आम आदमी पार्टीनेही एवढ्या मोठ्या संख्येत मतदार निवडणुकीपासून वंचित राहिल्याने पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी विशेष प्रयत्न केले होते. मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने विशेष उपक्रमही राबवले त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे याद्यांमध्ये नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2014 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close