S M L

पवार-मुख्यमंत्र्यांनी केली मोदींची हिटलरशी तुलना

Sachin Salve | Updated On: Apr 15, 2014 10:12 PM IST

पवार-मुख्यमंत्र्यांनी केली मोदींची हिटलरशी तुलना

cm_pawar_modi_hitler15 एप्रिल : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने थेट भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची हिटलरशी तुलना केलीय.

"जर्मनीत हिटलर नावाचा हुकूमशाह होऊन गेला. हिटलर लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवर निवडून आला आणि नंतर हुकूमशाह म्हणून उदयास आला. सर्व लोकांचे अधिकार त्याने काढून टाकले. त्याची काळी कारकीर्द अवघ्या जगाला माहिती आहे आणि आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने पुढे येत आहे त्याची भूमिका ही हिटलर सारखी आहे" असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींची तुलना थेट हिटलरशी केलीय.

तसंच नरेंद्र मोदींनी राज्यपालांच्या ठरावाच्या उत्तराधार्थ भाषण एकदाही केलं नाही कारण त्यांचा संसदीय परंपरांवर विश्वास नाही अशी टीकाही शरद पवारांनी केली. बारामतीमध्ये आज (मंगळवारी) सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंब एकत्र आलं होते. यावेळी ते बोलत होते. यासभेत अजित पवार ही हजर होते अजित पवारांनी सुरेश खोपडे यांच्यावर टीका केली. तर मला माझ्या मुलांना वेळ देता येत नाही, पण बारामतीच माझं कुटुंबीय आहे, असं म्हणत सुप्रिया सुळेंना अश्रू अनावर झाले.

दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही पुण्यात झालेल्या सभेत नरेंद्र मोदींची तुलना हिटलरशी केली. मोदींची वाटचाल ही हिटलरशाहीच्या दिशेनं सुरू आहे. मोदींनी पक्ष हायजॅक केलाय. भाजप म्हणजेच मोदी असं समिकरण झालंय. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करण्यात आलंय. हिटलरही लोकशाही पद्धतीने सत्तेवर आला आणि सर्वांना बाजूला करून हुकूमशाह झाला अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2014 10:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close