S M L

'मंडलिकांनी साखर विकून निवडणुकीत पैसे वापरले' !

Sachin Salve | Updated On: Apr 16, 2014 04:21 PM IST

Image img_232282_mushrifvsmandlik_240x180.jpg16 एप्रिल : कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाच्या आदल्या दिवशीच आता मंडलिक-मुश्रीफ यांच्यातला वाद पुन्हा उफाळून आलाय. विद्यमान खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा मुलगा संजय मंडलिक हे महायुतीचे उमेदवार आहेत.

त्यांनी आपल्या प्रचारासाठी मंडलिक साखर कारखान्यातील 20 ट्रक साखर विकून तो पैसा निवडणुकीत वापरल्याचा आरोप कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक प्रकाश गाडेकर यांनी केला आहे.

गेल्या 11 आणि 12 तारखेला हमीदवाड्यातल्या साखर कारखान्यातून बेकायदेशीरपणे ही साखर विक्री झाल्याची तक्रार गाडेकर यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे केलीय. विक्री केलेल्या साखरेची एक्साईज ड्युटी चूकवून रिकव्हरीनंतर ऍडजेस्ट करण्याचा डाव मंडलिकांचा असल्याचाही आरोप करण्यात आलाय. दरम्यान, मंडलिक यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळलेत. आणि आपल्याविरोधात राजकीय षडयंत्र रचलं जातं असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर जिल्हाधिकार्‍यांनी याबाबत तपास सुरू असल्याचं स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2014 04:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close