S M L

मतदारराजा, मतदान यंत्रणा झालीये सज्ज !

Sachin Salve | Updated On: Apr 16, 2014 10:49 PM IST

evm machin best16 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील 19 जागांसाठी दुसर्‍या टप्प्यात मतदान आता काही तासांवर येऊन ठेपलंय. सिंधुदुर्ग, बारामती, माढा, सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, अहमदनगर, बीडसह इतर ठिकाणी मतदानाची तयारी पूर्ण झालीय.

निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासन आणि पोलीस खाती मतदान शांततापूर्ण पार पडेल, याची पूर्ण काळजी घेण्यासाठी सज्ज झालीय. मतदान यंत्रांची पाहणी करणं, इतर व्यवस्था चोख ठेवणं यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.

त्याबरोबरच मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यासाठी पोलीस, निमलष्करी दलं, होमगार्ड यांना तैनात करण्यात येतंय.

पुण्यात जय्यत तयारी

पुण्यामध्येही मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. यासाठी पुण्यातल्या वेगवेगळ्या केंद्रांवर सध्या इव्हीएम मशिन्स आणि मतदानासाठीचं इतर साहित्य पोचवण्यासाठी लगबग सुरू आहे. हजारो कर्मचारी,पोलीस दल,पीएमपी बसेस आणि वाहनं यांची गर्दी सध्या या केंद्रावर पहायला मिळतेय.

पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतही उद्याच्या मतदानाची तयारी झालीय. मतदानासाठीची एसटी बसेससह महापालिकेच्या केएमटी बसेसचीही मदत निवडणूक आयोग घेणार आहे. तसंच जिल्ह्यात संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. सांगलीतही मतदानाची जय्यत तयारी झालीय.

माढात 7 हजार 617 पोलीस तैनात

लोकसभेच्या दुसर्‍या टप्याचं मतदान उद्या होतंय. यामध्ये माढा लोकसभा मतदार संघातील 17 लाख 5 हजार 991 मतदार तर सोलापूर मतदार संघातील 16 लाख 99 हजार 818 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठीची सर्व तयारी सुरू असून त्यासाठी 7 हजार 617 पोलीस तैनात करण्यात आले आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2014 06:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close