S M L

मतदान यंत्रात घोळ, भाजपचं मत काँग्रेसला !

Samruddha Bhambure | Updated On: Apr 17, 2014 05:47 PM IST

मतदान यंत्रात घोळ, भाजपचं मत काँग्रेसला !

pune voting17 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात दुसर्‍या टप्प्यात मतदान सुरू आहे. पण पुण्यामध्ये एका मतदान केंद्रावर मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याचं समोर आलंय. भाजपला मतदान करण्यासाठी कमळासमोरचं बटन दाबल्यावर काँग्रेसला मत जात असल्याचं समोर आलंय.

पुण्यातील शामराव कलमाडी शाळेतील मतदान केंद्रात हा प्रकार घडलाय. एका मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे एका खोलीतलं मतदान थाबवण्यात आलंय. भाजपचं बटन दाबलं तर मत काँग्रेसला जात असल्याची तक्रार जागरुक मतदारांनी संबंधित जिल्हा अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तातडीने या खोलीतलं मतदान थांबवण्यात आलं. या गडबडीमुळे मतदान

थोडावेळासाठी खोळबलं होतं. विशेष म्हणजे 23 जणांनी मतदानही केलं होतं. यामुळे काही काळ एका खोलीतलं मतदान थाबवण्यात आलं होतं. त्यानंतर मतदानाला पुन्हा सुरुवात झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 17, 2014 09:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close