S M L

'दुल्हन बाद में ले जायेंगे, पहिले मतदान करेंगे'

Sachin Salve | Updated On: Apr 17, 2014 04:26 PM IST

'दुल्हन बाद में ले जायेंगे, पहिले मतदान करेंगे'

karajt_navardev17 एप्रिल : हक्काचं मतदानाचा बजावण्यासाठी प्रत्येक जण लोकशाहीचं कर्तृव्य पार पाडत आहे. पण रायगडमध्ये एका नवरदेवाने आधी मतदान मग घोडीवर बसणार असा चंगच बांधला. मग काय नवरदेव घोडीवरुनच वाजत गाजत तडक मतदान केंद्र गाठले. चेतन पवार (24) असं नवरदेवाचं नाव आहे. हा किस्सा घडलाय कर्जतमध्ये.

राज्यात दुसर्‍या टप्प्यात मतदान सुरू आहे. रायगड जिल्ह्यात मावळ मतदारसंघातील कर्जत तालुक्यातल्या डिकसळ मतदान केंद्रावर दुपारी बाराच्या सुमारास एक नवरदेव अचानक पोहचले. त्यामुळे निवडणूक कर्मचार्‍यांची एकच तारांबळ उडाली.

चेतन पवारचं आज लग्न आहे. पण लग्न लावून येईपर्यंत मतदानाची वेळ टळून जाणार होती. मग नवरदेवाने चलाखी करत 'आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे' या म्हणी प्रमाणे, नवरदेवाने बाशिंग बांधून चक्क मतदान केंद्र गाठले आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे नवरदेव घरापासून वाजत गाजत मतदान केंद्रापर्यंत येत असताना प्रत्येक मतदारांना तो मतदारांना मतदान करा असे आवाहन करत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 17, 2014 02:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close