S M L

राणा-अडसूळ वादामुळे सेनेचा-राष्ट्रवादीशी काडीमोड

Sachin Salve | Updated On: Apr 18, 2014 08:31 PM IST

rana vs adsul18 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अमरावतीमधील राजकीय वातावरण चांगलचं तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा आणि शिवसेनेचे उमेदवार आनंद अडसुळ यांच्यातील वादामुळे राष्ट्रवादीशी काडीमोड घेण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे.

अमरावती जिल्हा परिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला पाठिंबा शिवसेनेने काढून घेतला आहे. पाठिंबा काढण्यासंदर्भातलं पत्र विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांना देण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुका जाहीर होताच अजित पवारांनी अमरावतीमधील प्रचारसभेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विरोधकांचा पाठिंबा काढून घेण्याची भूमिका जाहीर केली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी शिवसेनाचा उघड विरोध केला होता. शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ यांच्यावरही त्यांनी टीका केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2014 06:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close