S M L

पवारांनी केला होता सेनेशी हातमिळवणीचा प्रयत्न -जोशी

Sachin Salve | Updated On: Apr 19, 2014 04:22 PM IST

joshi on udhav3319 एप्रिल : 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला होता. पण नंतर पवारांनीच माघार घेतली, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नेते मनोहर जोशींनी केला. एका मराठी वृत्तपत्राला मनोहर जोशी यांनी मुलाखत दिली यावेळी त्यांनाही गौप्यस्फोट केला.

जोशी म्हणतात, सेना-राष्ट्रवादी एकत्र येतील यासाठी त्यावेळी चर्चा सुरू होती. एवढंच नाही तर निर्णय घेण्याची वेळही आली होती. उद्धव ठाकरे यांनीही संमती दिली होती. पण ऐनवेळी शरद पवारांनी माघार घेतली. शरद पवारांना कदाचित उद्धव यांचे नेतृत्व स्विकारण्यास अडचण वाटली असावी किंवा सेनेची भूमिका त्यांना पटली नव्हती म्हणून त्यांनी माघार घेतली. पण उद्धव यांनी पवारांशी चर्चा करण्यासाठी मला पुढाकार घेण्यास सांगितलं होतं. यासाठी पेडर रोड इथं राहणारे आपटे नावाच्या गृहस्थांच्या घरी आमची बैठकीही झाली होती. यावेळी मात्र उद्धव यांनी आता काही शक्य नसून राष्ट्रवादी -सेना युती होणार नाही असं म्हटलं होतं असंही जोशी यांनी सांगितलं.

शरद पवार हे राजकारणात अत्यंत हुशार व्यक्ती आहे. त्यांना राजकारण कसं करायचं हे चांगलं माहित आहे. म्हणून शरद पवारांना एकेकाळी वाटलं की आपण सेनेसोबत युती करावी. पण काही काळांनी त्यांना सेनेसोबत एकत्र येऊ वाटलं नाही आणि ते त्यांनी योग्य वेळी सांगितलं. पण राजकारणात एका पार्टीसोबत राहायचं उद्या दुसर्‍या पार्टीसोबत राहायचं हे अत्यंत धोकादायक आहे अशी टीकाही जोशी यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2014 03:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close