S M L

निवडणूक न लढवण्यार्‍यांनी टीका करू नये -पवार

Sachin Salve | Updated On: Apr 19, 2014 04:46 PM IST

udhav on sharad pawar19 एप्रिल : उद्धव ठाकरेंनी आयुष्यात एकही निवडणूक लढवली नाही, मी 14 वेळा निवडून आलोय त्यामुळे त्यांनी इतरांवर टीका करताना विचार करावा अशी टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव यांना लगावला. नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगावातल्या सभेत ते बोलत होते.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रचार सभेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सगळे नेते भ्रष्ट आहेत आणि शरद पवार त्यांचे कॅप्टन आहेत अशी टीका केली होती. शरद पवारांनी उद्धव यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेत आपल्या शैलीत उद्धव यांना प्रत्युत्तर दिलं.

उद्धव यांनी आयुष्यात कधी तरी निवडणूक लढवली आहे तरी का ? मी 14 वेळा निवडणूक लढवली आणि निवडून ही आलो. उद्धव यांनी दुसर्‍यांवर टीका करण्याच्या अगोदर याचा विचार करावा असा टोला पवारांनी लगावला. तसंच भाजपची निवडणुकीतल्या प्रचाराची पातळी घसरली आहे आणि भाजपची स्थिती तमाशातील कलाकारांसारखी झालीये असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2014 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close