S M L

राज्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 'गुरु'वारी अखेरची 'परीक्षा'

Sachin Salve | Updated On: Apr 22, 2014 08:15 PM IST

राज्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 'गुरु'वारी अखेरची 'परीक्षा'

MAHA_POLL_1847183e22 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी देशात सहाव्या आणि राज्यात तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज (मंगळवारी)थंडावल्या. 24 एप्रिलला 12 राज्यांतल्या 117 मतदारसंघात मतदान होणार आहे.

राज्यात तिसर्‍या टप्प्यात एकूण 19 मतदारसंघ असून 16 सर्वसाधारण, 3 एसटीचे मतदारसंघ आहे. 17 कोटी 20 लाख मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून 338 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.

या तिसर्‍या टप्प्यात ठाणे हा सर्वात मोठा मतदार संघ असून मुंबई दक्षिण मध्य हा सर्वात लहान मतदार संघ आहे. एकूण 34 हजार 343 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत आणि यासाठी तब्बल 2 लाख 62 हजार 724 कर्मचारी सज्ज झाले आहेत.

आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवार आणि नेत्यांनी रोड शोच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. भाजपचे नेते नरेंद्र मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या आज सभा झाल्या. तर नाशिक शहरात आज प्रचाराचा शेवटचा दिवस हा शक्तीप्रदर्शनाचा दिवस ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या तिन्ही उमेदवारांनी शहरातून मोठ्या रॅली काढल्या. पोलिसांनी काटेकोर नियोजन केल्यामुळे तीन वेगवेगळ्या मार्गाने आणि वेगवेगळ्या वेळांमध्ये या रॅलींचे आयोजन करण्यात आलं होतं.

इथं होणार मतदान

 • नंदूरबार
 • धुळे
 • जळगाव
 • रावेर
 • जालना
 • औरंगाबाद
 • दिंडोरी
 • नाशिक
 • पालघर
 • भिवंडी
 • कल्याण
 • ठाणे
 • उत्तर मुंबई
 • उत्तर मध्य मुंबई
 • उत्तर पूर्व मुंबई
 • उत्तर पश्चिम मुंबई
 • दक्षिण मध्य मुंबई
 • दक्षिण मुंबई
 • रायगड

मतदानाची तयारी

 • - मुंबईत एकूण 1,528 मतदान केंद्र
 • - एकूण 9 हजार 879 बुथ
 • - 2091 संवेदनशील बुथ
 • - 33 अतिसंवेदनशील बुथ

 पोलीस बंदोबस्त

 • - 38 डीसीपी
 • - 46 एसीपी
 • - 477 पीआय
 • - 1,115 एपीआय आणि पीएसआय
 • - 8 केंद्रीय निमलष्करी दलाच्या कंपन्या
 • - 19 एसआरपीएफच्या कंपन्या
 • - एकूण 30 हजार 25 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात
 • - 5 हजार 275 होमगार्डही सज्ज
 • - 250 सिव्हील डिफेन्सचे अधिकारी आणि कर्मचारी

तिसर्‍या टप्प्याचं मतदान

 • - एकूण मतदारसंघ - 19
 • - 16 सर्वसाधारण, 3 एसटीचे मतदारसंघ
 • - एकूण मतदार - 17 कोटी 20 लाख
 • - एकूण उमेदवार - 338
 • - सर्वात मोठा मतदारसंघ - ठाणे
 • - सर्वात लहान मतदारसंघ - मुंबई दक्षिण मध्य
 • - एकूण मतदान केंद्र - 34 हजार 343
 • - एकूण मतदान कर्मचारी - 2 लाख 62 हजार 724

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2014 08:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close