S M L

'गुजरात मॉडेलला भुरळून जाऊ नका,विचारपूर्वक मतदान करा'

Sachin Salve | Updated On: Apr 23, 2014 06:51 PM IST

'गुजरात मॉडेलला भुरळून जाऊ नका,विचारपूर्वक मतदान करा'

sent xavier college mumbai principal23 एप्रिल : उद्या लोकसभा निवडणुकीसाठी तिसर्‍या टप्प्यासाठी मुंबईत मतदान होतंय आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सेंट झेविअर्स कॉलेजच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना पाठवलेल्या ई मेल्समुळे वाद निर्माण झाला आहे.

सध्या गुजरातच्या विकासाचं चित्र रंगवलं जातंय. त्याबाबत पूर्ण विचार करूनच मतदान करा. देशात कॉर्पोरेट आणि धर्मांध शक्ती सत्तेवर येण्याची शक्यता निर्माण झालीय. त्याचा भविष्यात फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक मतदान करावं असं प्राचार्य फादर फ्रेझर मास्करान्हेन्स यांनी आपल्या ई मेल्स मध्ये म्हटलंय.

मात्र या प्रकारावर भाजप आणि शिवसेनेने तीव्र निषेध व्यक्त केलाय. प्राचार्यांनी अशी कुठल्याही पक्षाबद्दल भूमिका घेऊ नये असं भाजप आणि शिवसेनेनं सुनावलं. या प्रकरणी प्राचार्यांच्या गुजरात मॉडेलवर टीका करणार्‍या ई-मेलबद्दल भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2014 06:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close