S M L

डोण्ट वरी, शेवटच्या यादीत नाव असेल तर मतदान करू शकता !

Sachin Salve | Updated On: Apr 23, 2014 10:36 PM IST

डोण्ट वरी, शेवटच्या यादीत नाव असेल तर मतदान करू शकता !

568voting_in_mumbai23 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात तिसर्‍या टप्प्यात मतदान होत आहे. पण मतदार याद्यांच्या घोळानंतर मतदारांमध्ये बराच संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने खुलासा जारी केला आहे.

त्यानुसार, शेवटच्या मतदार यादीत ज्या मतदाराचं नाव आहे, त्यालाच मतदान करता येणार आहे. तसंच मतदारांची शहानिशा करताना जे मतदार गैरहजर होते किंवा त्यांचा पत्ता बदलला होता किंवा ज्यांची दोनदा नावं आहेत अशा मतदारांना मतदान करता येईल. अशा मतदारांच्या नावापुढे आधीच मतदार यादीत एएसडी म्हणजे "absent, shifted and duplicate" असं नमूद करण्यात आलं आहे. पण याखेरीज मतदार यादीत नाव नसेल तर मात्र मतदान करता येणार नाही.

मागील आठवड्यात पुण्यात झालेल्या मतदानाच्या वेळी लाखो मतदारांची नावच यादीत नसल्यामुळे मतदान करता आले नाही. पण हाच प्रकार नाशिक आणि आज ठाण्यातही घडला. नाशिकमध्ये तब्बल 3 लाख मतदारांची नावं यादीतून वगळण्यात आलीय. तर ठाण्यातून तब्बल 6 लाख मतदारांची नाव वगळण्यात आल्याची बाब समोर आलीय. याबद्दल खुद्द राज्याचे निवडणूक मुख्य अधिकारी नितीन गद्रे यांनी मतदार यादीत नावं वगळण्याच्या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी राहिल्या अनेक ठिकाणी नावं चुकून वगळली गेल्याची शक्यता आहे अशी कबुली दिली होती. मात्र आपल्याचा मतदानाचा हक्क बजावता येणार नाही यामुळे मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

तरच तुम्हाला मतदान करता येईल

  • तुमचं नाव शेवटच्या मतदारयादीत असेल
  • यादीच्या वेळी मतदारांची शहानिशा करताना तुम्ही गैरहजर राहिला
  • पत्ता बदललेला असेल
  • मतदार यादीत नावं असेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2014 07:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close