S M L

मनसे-सेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

Sachin Salve | Updated On: Apr 24, 2014 01:24 PM IST

mns_sena_rada_news424 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे मतदान सुरु आहे तर मुंबईत आदली रात वैर्‍याची ठरलीय. मानखुर्दमध्ये मध्यरात्री मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये राडा झाला. मनसे आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली यात पोलीस कॉन्स्टेबल विकास थोरवाले जखमी झाले आहे.

मानखुर्दमध्ये महाराष्ट्रनगरमध्ये ही घटना घडली. मनसेचे पुण्याचे उमेदवार दीपक पायगुडे पैसे वाटप करत होते असा आरोप शिवसेनेनं केला. एवढेच नाही तर मतदारांना पैसे वाटप करत असताना शिवसैनिकांनी मनसे कार्यकर्त्यांची गाडी पकडून दिली. यामुळे सेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली.

या दगडफेकीत विकास थोरवाल जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तसंच या दगडफेकीत काही गाड्यांचंही नुकसान झालंय. या प्रकरणी 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलमत 307, 332, 143, 147, 149 आणि कलम 114 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण अजूनही कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2014 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close