S M L

मतदारयाद्यांचा घोळ, अनेक जण मतदानाला मुकले

Samruddha Bhambure | Updated On: Apr 25, 2014 03:07 PM IST

Image img_48642_voting_240x180.jpg24 एप्रिल : लोकसभा निवडणूकीसाठी आज 19 मतदारसंघात मतदान झालं मात्र मतदारयाद्यांमध्ये झालेल्या घोळामुळे अनेक ठिकाणी हजारो मतदारांना अपल्या हक्कापासून मुकले. जळगावातही हजारो मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्का पासून वंचित रहावे लागलं आहे. राज्यात आज 19 ठिकाणी मतदान झालं. जळगाव लोकसभा मतदार संघात सर्व ठिकाणी आज सकाळी 7 वाजल्या पासून मतदानासाठी लोकांच्या तुरळक रांगा लागल्याचे चित्र होते,आज प्रत्यक्ष मतदानाचा दिवस उजाडल्या नंतर ज्यावेळेस मतदार मतदानास गेले तेव्हा अनेकांना आपले नावचं मतदार यादीत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे जळगावातील असंख्य मतदारांना आपल्यामुळे आपल्या मतदानाच्या पवित्र हक्का पासून वंचित रहावे लागले आहे.

अनेक मतदारांना आपल्या परिवारातल्या अनेक सदस्यांची नावे मतदार यादीतून डिलीट झाल्याचे दिसून आले. मतदार यादीत हजारो नावापुढे डिलीटचा शेरा मारलेला आढळल्याने जळगावतील अनेक मतदारांवर मतदानापासून वंचित राहाण्याची पाळी आली आहे. मागच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार्‍या अनेक मतदारांची नावे या यादीत नसल्याने नागरीकांमध्ये तीव्र असंतोष दिसून येतोय.

काही मतदारांनी तहसील कार्यालयात जाऊन तेथे उपस्थित असलेल्या प्रांतधिकारी अभिजित भांडे यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्या पुढे मांडल्या पण समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने असंतोष वाढून त्यांचे पर्यवसान प्रांताधिकारी यांना घेराव घालण्यात झाले. जिल्ह्याधिकारी यांच्या तर्फे योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्या नंतर पुढिल अनर्थ टळला, निवडणूक आयोगातर्फे पुढे काय कारवाई होतो या कडेचं नागरिकांचे लक्ष लागून आहे. जळगावत फेर मतदान घेण्यात यावे अशी मागणी असंख्य वंचित मतदार करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2014 06:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close