S M L

याद्यात घोळ हे काँग्रेस-राष्ट्रवादीचं षडयंत्र -नांदगावकर

Sachin Salve | Updated On: Apr 25, 2014 11:17 PM IST

26346bala nandgaonkar25 एप्रिल : मतदान याद्यांतून वगळलेलं मतदार हे सरकारविरोधात असल्याने हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला. तसंच या मतदान करू न शकलेल्या मतदारांना फेरमतदान करता यावं अशी मागणी नांदगावकर यांनी केलीय.

याबाबत त्यांनी त्यांनी मुख्य निवडणूक अधिकार्‍यांची भेट घेऊन तक्रार केली. तसंच याविरोधात ते कोर्टातही जाणार आहेत. भाजपनही या प्रकरणी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. वकील मोहन जयकर हे मतदार याद्यांमधली नावं गहाळ झाल्याप्रकरणी सोमवारी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहेत.

तर औरंगाबादमध्येही फेरमतदान घेण्याची मागणी औरंगाबादचे आम आदमी पक्षाचे उमेदवार सुभाष लोमटे यांनी केलीय. दरम्यान, भाजपच्या मतदारांची नावं जाणीवपूर्णक मतदार याद्यांमधून गहाळ करण्यात आली असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना त्यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलीय. यावेळी त्यांनी हा आरोप केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2014 09:15 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close