S M L

आली लहर केला कहर, एकाच मतदाराचे 66 वेळा यादीत नावं !

Sachin Salve | Updated On: Apr 29, 2014 09:07 PM IST

आली लहर केला कहर, एकाच मतदाराचे 66 वेळा यादीत नावं !

65voter kalyan29 एप्रिल : निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळे मतदार यादींतून लाखो मतदारांची नावं गायब झाल्याची अनेक उदाहरण या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाली.

पण निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेमुळे उल्हासनगर इथं राहणार्‍या एकाच मतदाराचं नाव तब्बल 66 वेळा मतदार यादीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. उल्हासनगर इथल्या संत रामदास हॉस्पिटल परीसरात राहणार्‍या माँटी लक्ष्मण टेकचंदानी या तरुणाचं 66 वेळा मतदार यादीत नाव आहे.

विशेष म्हणजे यातील 66 वेळा मोंटी लक्ष्मण टेकचंदानी यांच्या नावापुढे वेगवेगळ्या महिला आणि पुरुषांचे फोटो आहेत. आयोगाच्या या कारभारामुळे या 66 जणांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2014 08:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close