S M L

राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

Sachin Salve | Updated On: May 2, 2014 08:17 PM IST

89raj_thackarey_mns02 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात औरंगाबादमधल्या कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय. जालना-औरंगाबाद रोडवर एसटी बसेसवर मनसे कार्यकर्त्यांनी 2008 साली दगडफेक केली होती.

या प्रकरणी राज ठाकरेंना सुनावणीसाठी हजर राहायला सांगितलं होतं. पण राज ठाकरे सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्याने त्यांना अखेर वॉरंट जारी केलंय. आता या प्रकरणी पुढची सुनावणी 8 मे ला होणार आहे.

2008 साली राज यांनी उत्तर भारतीयांना टार्गेट केलं होतं. याप्रकरणी राज यांना अटकही करण्यात आलं होतं. या अटकेच्या निषेधार्थ मनससैनिकांनी राज्यभरात तोडफोड आणि जाळपोळ केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2014 08:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close