S M L

पेड न्यूज प्रकरणी अशोक चव्हाणांना सुप्रीम कोर्टाचा दणका

Samruddha Bhambure | Updated On: May 5, 2014 07:55 PM IST

568 ashok chavan 3405 मे :  राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना पेडन्यूज प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. पेड न्यूज प्रकरणी दिल्ली हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला आहे.

निवडणूक आयोगाला सुनावणी करण्याचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने अशोक चव्हाणांची याचिका फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाने आगामी 45 दिवसांत या प्रकरणाचा निकाल द्यावा असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर 2009 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये काही वृत्तपत्रांमध्ये पेड न्यूज देण्याचे आरोप झाले होते. याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने या प्रकरणात सुनावणी सुरू केली होती.

या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाला या संदर्भात कारवाईचे अधिकार नसल्याचा दावा करत अशोक चव्हाण यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सोमवारी सुप्रीम कोर्टात या याचिकेवर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने अशोक चव्हाणांची याचिका फेटाळून लावतानाच निवडणूक आयोगालाच पेड न्यूज संदर्भात कारवाई करण्याचे अधिकार आहेत असे स्पष्ट मत कोर्टाने मांडले. पेड न्यूजसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे.

हे पेड न्यूजचं प्रकरणं नेमकं काय आहे ते पाहूया...

  • माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर 2009च्या विधानसभा निवडणुकीत पेड न्यूज दिल्याचे आरोप
  • महाराष्ट्रातील अनेक आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये अशोकपर्व नावाची पुरवणी छापण्यात आली
  • ही बातम्यांची पुरवणी असल्याचा अशोक चव्हाणांचा दावा
  • पण ही छुपी जाहिरात असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा
  • निवडणूक आयोगाकडून प्रकरणाची सुनावणी सुरू
  • पण आयोगाला सुनावणीचा अधिकार नाही, असा अशोक चव्हाणांचा युक्तिवाद
  • निवडणूक आयोगाच्या अधिकाराला आधी हायकोर्टात, मग सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं
  • निवडणूक आयोगाला या प्रकरणाची सुनावणी करण्याचा अधिकार - सुप्रीम कोर्ट

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2014 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close