S M L

गुजरातींवरुन उद्धव ठाकरे -राऊतांमध्ये 'सामना'

Samruddha Bhambure | Updated On: May 6, 2014 08:35 PM IST

गुजरातींवरुन उद्धव ठाकरे -राऊतांमध्ये 'सामना'

uddhav_thackeray_2010020506 मे : मुंबईत गुजराती समाजाला टार्गेट करण्यावरुन शिवसेनेत मतभेद उफाळून आले आहेत. महाराष्ट्र दिनी सेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून 'बेपारी' गुजराती लोकं महाराष्ट्रदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होत का नाही ? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता खासदार संजय राऊत यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांनी या अग्रलेखासाठी उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतलीच नव्हती. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राऊतांवर नाराज आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि लीलाधर डाके यांना सामनामध्ये लक्ष घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्यावर संपादकीय कामावर देखरेख ठेवण्याचं काम सोपवण्यात आलंय. दरम्यान, आयबीएन-लोकमतला दिलेल्या प्रतिक्रियेत या बातमीचं संजय राऊत यांनी खंडन केलंय. वर्तमानपत्रात आलेल्या उलटसुलट बातम्यांमध्ये तथ्य नाही असा दावा राऊत यांनी केला.

'त्या' अग्रलेखात गुजराती व्यापार्‍यांबद्दल काय म्हटलंय होतं?

"मलबार हिल, वाळकेश्वर, कफ परेड, कुलाबा, जुहू भागात राहणारे धनवान लोक महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यात कधीच सहभागी झाले नाहीत. मुंबईतल्या पैशाच्या जोरावर हे सर्व उद्योगपती देशातल्या सत्तेचा सारीपाट मांडून बसले आहेत. एरवी 'आमचा राजकारणाशी संबंध नाही, आम्ही बरे की आमचा बेपार' असे बोलणारे हे सर्व 'बेपारी' आज आपल्या मातीचा आणि जातीचा पंतप्रधान व्हावा यासाठी प्रांतीय वज्रमूठ घेऊन एकत्र आलेच ना? पण महाराष्ट्राचे ऋण फेडण्यासाठी यापैकी किती 'बेपारी' महाराष्ट्र दिनी आपल्या उंची इमल्यांतून खाली उतरून महाराष्ट्र दिनाच्या जन्मोत्सवात सामील झाले?"

 

उद्धव यांनी केली सारवासारव

गुजराती समाजाला टार्गेट केल्याप्रकरणी खुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रक प्रसिद्ध करुन सारवासारव केली. गुजराती समाज आणि मराठी माणसाची एकजूट अशीच टिकवून ठेवूया, येणार्‍या सर्व निवडणुकांतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असणारा हा चमत्कार प्रत्यक्षात घडवून दाखवूया आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करूया असं आवाहनच  उद्धव ठाकरे यांनी गुजराती समाज बांधवांना केलं.

 

विशेष म्हणजे त्यापूर्वीही रोखठोक या 'सामना'मध्ये येणार्‍या सदरामध्ये संजय राऊतांनी प्रादेशिक पक्षाबाबत मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. " प्रादेशिक पक्षांनी लोकसभा निवडणुका लढवू नयेत या मुख्यमंत्र्यांच्या विचारावर चौफेर टीका झाली. देशाच्या लोकशाहीवर कुर्‍हाड चालवली असा सूर उमटला. असं असलं तरी त्यावर निदान चर्चा करायला काहीच हरकत नाही. देशभरात जात, धर्म, प्रांत यांच्या अस्मितांवर पक्ष तयार झाले, त्यामुळे देशाची एकात्मता राहिली नाही.प्रादेशिक पक्ष हे फक्त आपल्यापुरताच विचार करतात, देश म्हणून व्यापक भूमिका घेत नाहीत. त्यामुळे देशात अमेरिकेसारखी अध्यक्षप्रणाली असावी असा मतप्रवाह देशात आहे.असं असलं तरी काँग्रेसनंच आपली सत्ता टीकवण्यासाठी नेहमीच या प्रादेशिक पक्षांचा टेकू घेतला आहे."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2014 03:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close