S M L

राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरेंची आमदारकी धोक्यात?

Sachin Salve | Updated On: May 10, 2014 03:21 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरेंची आमदारकी धोक्यात?

10 मे : राष्ट्रवादीचे मुरबाडचे आमदार किसन कथोर अडचणीत आलेत. 2004 साली झालेल्या निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्र सादर करताना उल्हासनगर निवडणूक आयोगाला त्यांनी खोटी माहिती दिली होती.

त्यामुळे त्यांची कारकीर्द धोक्यात आली आहे. कथोरे निवडून आल्यानंतर आरटीआय कार्यकर्ते अरुण सावंत यांनी खोट्या प्रतिज्ञापत्रासंदर्भात याचिका दाखल केली. 2007 साली याचा निकाल कथोरेंच्या विरोधात गेला.

या निकालाला आव्हान देणारी याचिका कथोरेंनी दाखल केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळलीय आणि मुंबई हायकोर्टाला पुढच्या कारवाईचे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2014 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close