S M L

विधानसभेच्या कामाला लागा, पवारांचे नेत्यांना आदेश

Sachin Salve | Updated On: May 10, 2014 08:25 PM IST

विधानसभेच्या कामाला लागा, पवारांचे नेत्यांना आदेश

68ncp_meet10 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला एक आठवडा राहिला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवारी) आढावा बैठक घेतली. याबैठकीत 21 जागांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश मंत्र्यांना दिले आहे.

मुंबईत देवगिरी बंगल्यावर ही बैठक पार पडली. या अगोदरही पवारांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीत लोकसभेत किती जागा मिळतील याचा आढावा घेण्यात आला होता. राज्यात तीन टप्प्यात मतदान पार पडले. मतदानाची अंतिम टक्केवारी आता जाहीर झालीय. त्यामुळे पवारांनी आज पुन्हा एकदा बैठक घेतली.

या बैठकीत विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती आखण्याबाबत चर्चा झाल्याचं कळतंय. या बैठकीला अजित पवार, आर.आर.पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह सर्वच नेते हजर होते. मात्र बैठक झाल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना टाळलं. राष्ट्रवादीचा कोणताही नेता मीडियाला सामोरं गेला नाही. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीची काय भूमिका असेल याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2014 08:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close