S M L

'इन्कम टॅक्स'ची राष्ट्रवादीला नोटीस, गडकरींना क्लीन चिट

Sachin Salve | Updated On: May 12, 2014 02:17 PM IST

'इन्कम टॅक्स'ची राष्ट्रवादीला नोटीस, गडकरींना क्लीन चिट

66it_ncp_gadkari12 मे : मुंबई आयकर विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसला नोटीस बजावली तर भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना क्लीन चिट दिलीय. लोकसभा निवडणूक काळात मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांच्या काळात राष्ट्रवादीच्या खात्यात मोठ्या प्रमाणात बेनामी रक्कम जमा झाली.

गेल्या वर्षभरात राष्ट्रवादीच्या खात्यात तब्बल 61.5 कोटी रुपये जमा झाले, त्यापैकी 34 कोटी रुपये रोख जमा झाले होते. त्यापैकी 20.75 कोटी रुपये जमा करणार्‍यांचे नाव किंवा पॅन क्रमांक याची माहिती नाही. त्यामुळे त्याचा तपास सुरू आहे. तर भाजपचे नेते नितीन गडकरींना आयकर विभागाने क्लिन चीट दिलीये.

गडकरींविरूद्ध कुठलीही चौकशी सुरू नाही त्यांच्या विरूद्ध कुठलीही चौकशी झाली नाही किंवा प्रलंबितही नाही असं आयकर विभागाने स्पष्ट केलंय. आरटीआय कार्यकर्ते सुमीत दलाल यांनी माहितीच्या अंतर्गत ही माहिती मिळवलीये. गडकरींचं नाव भाजपच्या अध्यक्षपदासाठी दुसर्‍यांदा चर्चेत असताना गडकरींच्या पूर्ती उद्योगसमुहाबाबत अनेक गैरव्यवहाराचे आरोप झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 12, 2014 02:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close