S M L

अशोक चव्हाणांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

Sachin Salve | Updated On: May 12, 2014 08:18 PM IST

asokh chavan12 मे : पेड न्यूज प्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आज (सोमवारी) आणखी एक झटका बसलाय. पेड न्यूज प्रकरणी निवडणूक आयोगाने चव्हाण यांना नोटीस बजावली आहेत.

निवडणूक आयोगाने नोटीस बजावून 23 तारखेला आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मागील आठवड्यात पेड न्यूज प्रकरणी निवडणूक आयोगाला सुनावणी करण्याचा अधिकार आहे, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता.

याप्रकरणात दिल्ली हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला. पेड न्यूज प्रकरणी आयोगाला सुनावणी करण्याचा आयोगाला अधिकार नाही, असा अशोक चव्हाणांचा दावा होता.

त्याबद्दल चव्हाण यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आणि महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणाची दररोज सुनावणी करून 45 दिवसांत सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. अशोक चव्हाण यांच्यावर 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पेड न्यूज देण्याचे आरोप आहे.

पेड न्यूजचं प्रकरणं नेमकं काय आहे ?

  • - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर 2009च्या विधानसभा निवडणुकीत पेड न्यूज दिल्याचे आरोप
  • - महाराष्ट्रातील अनेक आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये 'अशोकपर्व' नावाची पुरवणी छापण्यात आली
  • - ही बातम्यांची पुरवणी असल्याचा अशोक चव्हाणांचा दावा
  • - ही छुपी जाहिरात असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा
  • - निवडणूक आयोगाकडून प्रकरणाची सुनावणी सुरू
  • - पण आयोगाला सुनावणीचा अधिकार नाही, असा अशोक चव्हाणांचा युक्तिवाद
  • - निवडणूक आयोगाच्या अधिकाराला आधी हायकोर्टात, मग सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं
  • - निवडणूक आयोगाला या प्रकरणाची सुनावणी करण्याचा अधिकार - सुप्रीम कोर्ट
  • - निवडणूक आयोगाची चव्हाणांना नोटीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 12, 2014 08:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close