S M L

आघाडी भुईसपाट होईल -राजू शेट्टी

Sachin Salve | Updated On: May 13, 2014 05:37 PM IST

raju shetty on aap13 मे : देशात एनडीएला बहुमत मिळेल तर राज्यात महायुतीला 35 पेक्षा जास्त जागा मिळतील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भुईसपाट होईल असं भाकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं.

तसंच आपण स्वत: आणि सदाभाऊ खोत निवडून जाऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस - राष्ट्रवादीला सत्तेचा माज भोवला आहे. कुंपणावर बसणार्‍यांना एनडीएमध्ये प्रवेश नाही असा टोला नाव न घेता राष्ट्रवादीला लगावला.

संघर्ष हा आपल्या पाचवीलाच पुजलाय पण आपण हातकणंगलेमधून बाजी मारू तसंच नव्या सरकारमध्ये शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्याकरता प्रयत्नशील राहू असं मत शेट्टी यांनी पुण्यात आयबीएन लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 13, 2014 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close