S M L

मुंडेंची नाराजी दूर,बैठकीला हजर

Sachin Salve | Updated On: May 14, 2014 07:44 PM IST

मुंडेंची नाराजी दूर,बैठकीला हजर

14 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकालानिमित्ताने भाजपने बैठकींचा सपाटा लावलाय. गुजरातमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बैठक होत आहे तर राज्यातही भाजपच्या कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. मात्र या बैठकीच्या पत्रिकेत नाव नसल्याने भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे नाराज झाले आहे. आपलं नावं पत्रिकेत वगळण्यात आल्यामुळ मंुडेंनी बैठकीकडे पाठ फिरवली. मुंडे नाराज असल्यामुळे त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. माधव भांडारी आणि गिरीश महाजन या नेत्यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली आणि ते बैठकीला हजर झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2014 04:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close